Fish

Thursday, 28 July 2011

पाउसवेडा!


ओल्या  रस्त्यांवर  अनवाणी चालताना,
पावलांना  टोचलेले  खडे ,
अंगावर  येणारी  शिरशिरी,
मन  भिजले  पाऊसवेडे
गवताला  बिलगून  बसलेले,
पावसाचे  थेंब  तुडवताना,
डबक्यातील  गढूळ  पाणी
हलकेच  उडवताना,
पावसाच्या  रिमझिम धारा,
हातावर  झेलताना,
हरवून  जातो, मुले पावसात खेळताना ,
हा  पाऊस  कधी  संपू  नये,
गालावरले  थेंब  पुसू  नये,
जाता  जाता  पावसाची
ताटातूट  होऊ  नये
मी  असाच रमतो
येणाऱ्या  प्रत्येक पावसात ,
मी असाच  पाउसवेडा ,
या ओल्या  चिंब  दिवसात .
                                  मैत्रेय(अमोल कांबळे)

0 comments:

Post a Comment